PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 20, 2025   

PostImage

अमिर्झाच्या बँकेत अपमानास्पद वागणूक!


 

गडचिरोली : तालुक्याच्या अमिर्झा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची शाखा आहे. या बँकेत परिसराच्या दहा गावांतील नागरिकांची बँक खाती आहेत; येथे व्यवहार करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापकाकडून हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.

 

अमिर्झा येथे चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, मुरमाडी, भिकारमौशी, आंबेटोला, आंबेशिवणी, जेप्रा, राजगाटा, धुंडेशिवणी, कळमटोला, पिपरटोला, बोथेडा आदी गावांतील ग्राहक बँकेतून पैसे काढणे व जमा करण्याकरिता येतात. माहिती विचारल्यानंतर त्यांना योग्य व सन्मानजनक वागणूक देणे गरजेचे आहे; परंतु येथील बैंक व्यवस्थापकासह येथील कर्मचारीसुद्धा ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. व्यवस्थापकाची सध्या मनमानी सुरू आहे.

 

नवीन खाती काढण्यासाठी कुणी गेले असता, कशासाठी खाते काढता, असे उलट बोलतात, असा आरोप अमिर्झासह चांभार्डा येथील ग्राहकांचा आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली.